advertisement

Navi Mumba: उगाच मोबाईल हातात घेतला, ऑनलाईन शॉपिग केली अन् बसला मोठा फटका; नेमकं काय घडलं?

Last Updated:

Navi Mumbai : ऐरोलीतील एका महिलेकडून ऑनलाईन खरेदीदरम्यान मोबाईल हॅक करून २१.३८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. एका शॉपिग अॅपच्या माध्यमातून ही घटना घडली असून रबाळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

News18
News18
नवी मुंबई : ऑनलाईन खरेदीदरम्यान मोबाईल हॅक करून महिलेची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना ऐरोली परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी शॉपिंग अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शॉपिग करताना 'ही' चुक नडली
ऐरोली येथे राहणारी एक महिला ऑनलाईन खरेदीसाठी एका प्रसिद्ध शॉपिंग अॅपचा वापर करत होती. त्यांनी काही वस्तू या अॅपवरून मागवल्या होत्या. खरेदीच्या प्रक्रियेदरम्यान संबंधित व्यक्तीने आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी महिलेकडून मोबाईलचा अॅक्सेस मागून घेतला. विश्वास ठेऊन महिलेने मोबाईलचा अॅक्सेस दिल्यानंतर आरोपीने तिचा मोबाईल हॅक केला.
बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने पैसे वळवले
यानंतर आरोपीने महिलाच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने 21 लाख 38 हजार 600 रुपये स्वतःच्या खात्यात वळवले. ही संपूर्ण घटना 19 जून ते 22 जून 2025 या कालावधीत घडली असल्याचे तपासात समोर आले आहे.
advertisement
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने तात्काळ सायबर गुन्हे शाखेला ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत बुधवारी उशिरा रात्री रबाळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिसांकडून करण्यात येत असून नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना कोणालाही मोबाईल अॅक्सेस, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumba: उगाच मोबाईल हातात घेतला, ऑनलाईन शॉपिग केली अन् बसला मोठा फटका; नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Ajit Pawar Funeral: पाया पडले...मिठी मारली...अजितदादांना लेकाकडून शेवटचा निरोप, डोळ्यात पाणी आणणारा Video
पाया पडले...मिठी मारली...अजितदादांना लेकाकडून शेवटचा निरोप, डोळ्यात पाणी आणणारा
  • अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय या दोघांनी अंत्यसंस्कार विधी पार पाडल्या.

  • यावेळी एका क्षणामुळे वातावरण आणखीच भावूक झाले.

View All
advertisement