advertisement

Ajit Pawar Funeral : झंझावत कायमचा विसावला! अजितदादा पंचतत्वात विलीन, लाखोंच्या जनसागराचा भावूक निरोप

Last Updated:

Ajit Pawar Funeral: राज्याच्या राजकारणातील एक झंझावात आणि बारामतीकरांचे लाडके 'दादा' म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

झंझावत कायमचा विसावला! अजितदादा पंचतत्वात विलीन, लाखोंच्या जनसागराचा भावूक निरोप
झंझावत कायमचा विसावला! अजितदादा पंचतत्वात विलीन, लाखोंच्या जनसागराचा भावूक निरोप
बारामती, पुणे: राज्याच्या राजकारणातील एक झंझावात आणि बारामतीकरांचे लाडके 'दादा' म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला होता. प्रत्येक बारामतीकराच्या डोळ्यात आज अश्रू होते, तर आसमंत 'अजितदादा अमर रहे'च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. राज्याच्या राजकारणातील मागील चार दशकांपासूनचे एक पर्व आज समाप्त झाले. अजित पवारांच्या निधनाने राजकारणच नव्हे तर सहकार ते  सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.
अजित पवार यांचे पार्थिव काल बुधवारपासूनच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, तेव्हापासूनच लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. आज सकाळी अजितदादांचे पार्थिव काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे समर्थक आपल्या नेत्याची शेवटची झलक पाहण्यासाठी पोहोचले होते. तर, दुसरीकडे देशपातळीपासून ते राज्यातील महत्त्वाच्या नेते मंडळीदेखील बारामतीमध्ये दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, रामदास आठवले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यासह अनेक नेते बारामतीमध्ये दाखल झाले होते.
advertisement
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या वाहनातून अजितदादांची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिक हात जोडून उभे होते. तर, विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात लाखोंचा जनसागर लोटला होता.
advertisement

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज्य पोलीस दलाच्या वतीने अजित पवार यांना हवेत गोळ्या झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मंत्रोच्चारांच्या घोषात त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी "अजितदादा अमर रहे", 'अजितदादा परत या..', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे पर्व संपले असून, बारामती आज खऱ्या अर्थाने पोरकी झाली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Funeral : झंझावत कायमचा विसावला! अजितदादा पंचतत्वात विलीन, लाखोंच्या जनसागराचा भावूक निरोप
Next Article
advertisement
Ajit Pawar Funeral: पाया पडले...मिठी मारली...अजितदादांना लेकाकडून शेवटचा निरोप, डोळ्यात पाणी आणणारा Video
पाया पडले...मिठी मारली...अजितदादांना लेकाकडून शेवटचा निरोप, डोळ्यात पाणी आणणारा
  • अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय या दोघांनी अंत्यसंस्कार विधी पार पाडल्या.

  • यावेळी एका क्षणामुळे वातावरण आणखीच भावूक झाले.

View All
advertisement