Mumbai Weather : मुंबईत उन्हाचा कडाका, कोकणाला पुन्हा पाऊस झोडपणार, 3 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

Last Updated:
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 22 ऑक्टोबर 2025 रोजी कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
1/5
ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसभर उन्हाचा कडाका आणि संध्याकाळी अचानक पावसाच्या सरी अशी सध्याची मुंबई आणि कोकणाची हवामानाची परिस्थिती दिसून येते. काल दिवसभर मुंबईत उन्हाची तीव्रता जाणवत होती, पण सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडल्याने हवामानात थोडासा बदल जाणवला. आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 22 ऑक्टोबर 2025 रोजी कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

advertisement
2/5
मुंबईमध्ये आज वातावरण कोरडे राहणार आहे. दिवसभर उन्हाचा कडाका कायम राहील, त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा ऑक्टोबर हिटचा अनुभव येणार आहे. संध्याकाळच्या सुमारास हलक्या ढगांची शक्यता वर्तवली असली, तरी पावसाची शक्यता नाही. उकाडा मात्र नागरिकांना जाणवणारच आहे.

3/5
ठाणे आणि नवी मुंबई भागात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढला आहे. आजही या भागात कोरडं हवामान राहणार असून कोणत्याही प्रकारचा पाऊस होणार नाही. दुपारी तापमान वाढेल आणि उकाडा जाणवेल, त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

4/5
पालघरमध्ये हवामान विभागाने आज कोरडं वातावरण राहील असं सांगितलं आहे. इथे दिवसभर जोरदार ऊन आणि उकाडा राहणार असून पावसाचा कोणताही अंदाज नाही. गेल्या काही दिवसांत या भागात हलक्या सरी पडल्या होत्या, पण आज मात्र उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे.

5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पाऊस पडणार आहे. रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये, विशेषतः नवी मुंबईलगतच्या किनारी भागांत, पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement