MNS Deepotsav 2025: ठाकरे फॅमिली एकाच फ्रेममध्ये, पण संजय राऊतांचं टायमिंग चुकलं, PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहे. आज मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क परिसरात मनसेच्या वतीने दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलंय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दीपोत्सवाचं उद्घाटक म्हणून उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती, व्यासपीठावर दीपोत्सवाची आकर्षक लायटिंग सुरू करण्यासाठी बटण दाबायचे होते. राज यांनी उद्धव यांना आग्रह केला. त्यावेळी संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागेच होते. रश्मी ठाकरे यांनी संजय राऊत यांना पुढे येण्यास सांगितलं. पण, तोपर्यंत उद्घाटन पार पडलं होतं. दीपोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतरही संजय राऊतांचा हा बटणावरच होता.
advertisement