Video: मुलं, सुना-नातवंडांना एकत्र पाहून राज ठाकरेंच्या आईंच्या डोळ्यात पाणी, मनसेच्या दीपोत्सवातील हळवा क्षण
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घटनाचे निमित्त असले तरी या निमित्ताने ठाकरेंचे मनोमिलन पाहायला मिळाले आहे.
मुंबई: शिवाजी पार्कवरील दीपोत्सवाचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते झाले. या दीपोत्सवाच्या उद्घटनाचे निमित्त असले तरी या निमित्ताने ठाकरेंचे मनोमिलन पाहायला मिळाले आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेस शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित होते. या दीपोत्सवासाठी ठाकरे कुटुंब देखील सुद्धा उत्साही होते. या वेळी हे चित्र पाहून राज ठाकरेंच्या मातोश्रींच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता दीपोत्सवाला प्रथमच उद्धव ठाकरे हजेरी लावली. त्यामुळे यंदाचा दीपोत्सव ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचा ठरला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या शिवाजी महाराज पार्कमध्ये 17 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30
advertisement
वाजता या दीपोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मनसेच्या दीपोत्सवाचे हे 13 वे वर्ष आहे. तरुण-तरुणींमध्ये या दीपोत्सवाचे प्रचंड आकर्षण असून या ठिकाणी छायाचित्र काढण्यासाठी मुंबईकरांची गर्दी होत असते.
दीपोत्सवाच्या उद्घाटनाला दरवर्षी विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध मंडळी हजेरी लावतात.
- 2018 - सचिन तेंडुलकर
- 2022- एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस
- 2023 - जावेद अख्तर
- 2024 - रोहित शेट्टी, सिंघम चित्रपटाची टीम
advertisement
ठाकरे कुटुंब एकत्र
शिवाजी पार्कवरील उद्घटनाला ठाकरे बंधू, अमित- आदित्य आणि दोन्ही जावा रश्मी- शर्मिला ठाकरे हे एकाच गाडीतून प्रवास करताना पाहायला मिळाले.
राजकीय भाष्य करणे टाळले
advertisement
मनसेचा यंदाचा दीपोत्सव सोहळा संपन्न झाला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी यावेळी राजकीय भाष्य करणे टाळले.
यंदा मनसेच्या दीपोत्सवात राज- उद्धव हे दोन भाऊच नाही तर दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्यही एकत्र दिसणार आहेत. दीपोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिवाळीनिमत्त चांगलेच राजकीय फटाके फुटणार अशा चर्चांना उधाण आलं होतं मात्र कोणत्याही राजकीय विषयावर भाष्य करणे दोघांनी टाळले. शिवाजी पार्कात पोहोचलेल्या उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 7:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video: मुलं, सुना-नातवंडांना एकत्र पाहून राज ठाकरेंच्या आईंच्या डोळ्यात पाणी, मनसेच्या दीपोत्सवातील हळवा क्षण