60 दिवसांनी 'ठरलं तर मग' ला मिळणार नवी 'पूर्णा आजी', कोण घेणार ज्योती चांदेकरांची जागा? तुम्ही ओळखलं का?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Tharla Tar Mag Poorna Aaji : काही दिवसांपूर्वी 'पूर्णा आजी'ची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे दुःखद निधन झाले, ज्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली होती.
मुंबई : टीआरपीच्या शर्यतीत गेल्या अनेक वर्षांपासून अव्वल स्थान टिकवून ठेवलेली लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये लवकरच एक मोठा आणि महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेले पात्र म्हणजे पूर्णा आजी.
काही दिवसांपूर्वी 'पूर्णा आजी'ची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे दुःखद निधन झाले, ज्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली होती. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे मालिकेतील हे महत्त्वाचे पात्र अर्ध्यावरच सोडावे लागले.
'अन्नपूर्णा निवास' मध्ये पुन्हा आनंद!
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर आता मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. काही चाहत्यांनी ही भूमिका कोणीच साकारू नये, असे मत मांडले, तर काहींनी अनेक ज्येष्ठ अभिनेत्रींची नावे सुचवली. अखेर, स्टार प्रवाह वाहिनीने एका प्रोमोद्वारे या प्रश्नाला पूर्णविराम दिला आहे.
advertisement
हेमा मालिनीशी लग्न करायची स्वप्न पाहत होता अभिनेता, मन मोडल्यानंतर झाला उद्ध्वस्त, हिरोचा शेवट भयंकर
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये, पूर्णा आजीची एंट्री होताना दाखवली आहे. मात्र, त्यांचा चेहरा न दाखवता त्यांची फक्त पाठमोरी आकृती दाखवण्यात आली आहे. "अन्नपूर्णा निवासात पुन्हा एकदा आनंद घेऊन येणार पूर्णाआजी" असे कॅप्शन देऊन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
advertisement
प्रेक्षकांनीच सांगितलं त्या अभिनेत्रीचं नाव
हा प्रोमो पाहताच, नेटकऱ्यांनी अंदाज लावण्यास सुरुवात केली आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. विशेष म्हणजे, एकाच ज्येष्ठ अभिनेत्रीचे नाव वारंवार कमेंटमध्ये येत आहे, ज्यामुळे आता प्रेक्षकांना खात्री झाली आहे. प्रोमोवरील कमेंट्समध्ये प्रेक्षकांनी लिहिलंय, "होणार सून मी या घरची मधली आई आजी", "रोहिणी हट्टंगडी!", "रोहिणी ताई हट्टंगडीच असणार.", "खूप इमोशनल, अंगावर काटा आला, असं वाटलं जुनी पूर्णा आजीच आली."
advertisement
व्हिडिओवरील या कमेंट्सवरून प्रेक्षकांचे ठाम मत आहे की, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या मालिकेत नव्या पूर्णा आजीच्या भूमिकेत दिसतील. आता या भूमिकेत नक्की कोण येणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 7:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
60 दिवसांनी 'ठरलं तर मग' ला मिळणार नवी 'पूर्णा आजी', कोण घेणार ज्योती चांदेकरांची जागा? तुम्ही ओळखलं का?