थांबा... दिवाळीत ड्रायफ्रुटचा बॉक्स गिफ्ट करताय, ‘हा’ VIDEO पाहाच; 1000 वेळा विचार करा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
दिवाळी आली की भेसळयुक्त मिठाई बाजारात दाखल होते. त्यामुळे गेल्या काही वर्षात सामान्य नागरिक मिठाई ऐवजी ड्रायफ्रूट्सकडे वळले.
मुंबई : . सणासुदीच्या या दिवसात ड्रायफ्रूट्सना मोठी मागणी असते.. तुम्हीही तुमच्या पाहुण्यांसाठी ड्रायफ्रूट मिठाई किंवा ड्रायफ्रुटची खरेदी करणार असाल तर थांबा ड्रायफ्रूटसची ही खरेदी तुमच्या जीवावर बेतू शकते. कारण या मागणीचा फायदा घेत काही भेसळखोरांनी बाजारपेठेत मोठा गोरखधंदा सुरू केल्याचे उघड झाल्याचे समोर आला आहे.
दिवाळी आली की भेसळयुक्त मिठाई बाजारात दाखल होते. त्यामुळे गेल्या काही वर्षात सामान्य नागरिक मिठाई ऐवजी ड्रायफ्रूट्सकडे वळले. पण आता तेही सेफ नाहीय. भेसळखोरांनी तिथेही भेसळ करायाला सुरुवात केलीय. त्यामुळे डोळे झाकून नाही तर खात्री करूनच ड्रायफ्रूट्सची खरेदी करा..
पुण्यात दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे. एफडीएकडून राबवण्यात आलेल्या विशेष मोहीमेत 1 कोटी 97 लाख 93 हजार 42 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेत 353 अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. . कारवाईदरम्यान खवा, स्वीट मावा, गाईचे तुप, खाद्यतेल, दुध, पनीर, आदी पदार्थाचे एकूण 654 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 216 नमुने कमी दर्जाचे निघाले.
advertisement
ड्रायफ्रुटमुळं आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
मिठायांमध्ये भेसळ होत असल्यानं अनेक जण ड्रायफ्रुटला पसंती देत असतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रुट्सची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढते. पण या ड्रायफ्रुटमध्येही भेसळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये ही भेसळ सुरू होती. काही गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे बदाम आणि इतर ड्रायफ्रुटमध्ये भेसळ करण्यात येतेय. या ड्रायफ्रुटना केमिकल लावून त्याला चमकदार बनवण्यात येतंय. गाळ्यांमधील गलिच्छ वातावरणात हा प्रकार सुरू आहे. जमिनीवर उघड्यावर टाकलेल्या या ड्रायफ्रुटमुळं आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 7:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
थांबा... दिवाळीत ड्रायफ्रुटचा बॉक्स गिफ्ट करताय, ‘हा’ VIDEO पाहाच; 1000 वेळा विचार करा