दिवसा ऊन, संध्याकाळ पावसाळी, मुंबईत जैसे थे स्थिती! कोकणाला वादळी वाऱ्यांचा इशारा

Last Updated:
Mumbai Weather Update: मुंबईत सध्या दिवसा ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशी स्थिती आहे. वातावरणात सतत होणाऱ्या या बदलांमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, हलकी कणकण सोसावी लागतेय. त्यामुळे हवामान स्थिर होईपर्यंत प्रत्येकानं आपापलं आरोग्य जपणं आवश्यक आहे. (प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी / मुंबई)
1/5
राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. एकतर धो धो पाऊसही कोसळत नाही किंवा पूर्णपणे विश्रांतीही घेत नाही. अधूनमधून पाऊस हजेरी लावतोय. त्यामुळे छत्री घेऊन बाहेर पडायचं की नाही हा प्रश्नच पडतोय. 

advertisement
2/5
आता दिवाळी तोंडावर आलेली असतानाही हवामान विभागानं राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे, तर काही भागांना हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

3/5
आज, 22 ऑक्टोबर रोजी मुंबईचं कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या जवळपास असण्याचा अंदाज आहे. तसंच हलका ते मध्यम पाऊसही पडू शकतो. 

4/5
उपनगरांमध्येही ऊन, पावसाचा खेळ सुरूच आहे. नवी मुंबईच्या काही भागांमध्येदेखील पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. 

5/5
एकूणच कोकणात पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथं वादळी वारे वाहू शकतात. तर, सिंधुदुर्गमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. 

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement