नेते CM चा चेहरा म्हणून पाहायचे पण निघाली 'गद्दार', कोण आहेत सोफिया फिरदौस? ज्यांनी केला काँग्रेसचा गेम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोफिया फिरदौस, ओडिशातील पहिल्या मुस्लिम महिला आमदार, काँग्रेसच्या आदेशाविरुद्ध क्रॉस व्होटिंग केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी. त्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या विजयानंतर त्यांना राजकारणातील 'जायंट किलर' म्हटलं जाऊ लागलं. मात्र, विजयाचा हा गुलाल सुकण्यापूर्वीच त्यांनी पक्षाविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले. ओडिशात राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी मतदान झाले. काँग्रेसने BJD उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सोफिया यांनी या निर्णयाला जाहीर विरोध केला. पक्षाने दिलेला व्हिप धुडकावत त्यांनी पक्षविरोधी मतदान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
advertisement
advertisement
सोफिया फिरदौस यांची सार्वजनिक विधानं आणि मतदानाच्या वेळी घेतलेली भूमिका यामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी या घटनेची गंभीर दखल घेत सोफिया यांची काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून हकालपट्टी केली . ज्या सोफियांकडे पक्षाचं भविष्य म्हणून पाहिलं जात होतं, त्यांनीच पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.










