advertisement

YouTubeवर सिल्व्हर बटण कधी मिळतं? पाहा 10 हजार व्ह्यूजवर मिळतात एवढे पैसे

Last Updated:
YouTube Silver Button: यूट्यूबवर फक्त व्हिडिओ पाहत असाल तर जाणून घ्या की, ,तुम्ही व्हिडिओ तयार करुन लाखो रुपये कमवू शकता. आज आपण यूट्यूबविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
1/7
YouTube Silver Button: आपल्यापैकी जवळपास सर्वच हे यूट्यूबचा काहीना काही कामासाठी उपयोग करत असतो. कधी आपण अभ्यासाठी यूट्यूब व्हिडिओ पाहतो तर कधी रेसिपी तयार बघण्यासाठी, एंटरटेनमेंटसाठी यूट्यूब व्हिडिओ पाहत असतो. पण हे आता फक्त मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. तर तुम्ही या माध्यमातून मोठी कमाई करू शकता.

2/7
अनेक लोक हे आपलं चॅनल सुरू करुन व्हिडिओ अपडोल करतात. मग हळुहळू फॉलोअर्स वाढतात आणि चांगले उत्पन्नही त्यांना मिळते. यासोबतच यूट्यूब हे क्रिएटर्सला सब्सक्रायबर माइलस्टोनच्या आधारावर खास अवॉर्डही देत असते. यालाच क्रिएटर अवॉर्ड असं म्हटलं जातं.

3/7
सिल्व्हर प्ले बटण कधी मिळतं? : यूट्यूबवर सिल्व्हर बटण मिळवण्याचं स्वप्न प्रत्येक नव्या क्रिएटरचं असतं. हा अवॉर्ड तुमच्या चॅनलवरील सब्सक्रायबरची संख्या 1 लाखांपर्यंत पोहोचल्यावरच मिळतं. याला अधिकृतरित्या YouTube Silver Play Button असं म्हटलं जातं.

4/7
ज्यावेळी एखांद चॅनल हे माइलस्टोन पूर्ण करते तेव्हा यूट्यूब त्या चॅनलची समीक्षा करते. चॅनल प्लॅटफॉर्मच्या सर्व नियम आणि गाइडलाइन्सचं पालन करत असेल तेव्हाच हे सिल्व्हर बटण पाठवलं जातं. हा अवॉर्ड क्रिएटरसाठी मोठा अवॉर्ड मानला जातो. कारण यावरुन त्यांच्या कंटेंट मोठ्या प्रमाण लोक पाहत आहे हे दिसते.

5/7
YouTube वरुन कशी होते कमाई : YouTube वर पैसा कमावण्यासाठी सर्वात आधी चॅनलला YouTube Partner Program मध्ये सामिल करावं लागेल. यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. यात 1000 सब्सक्रायबर आणि गेल्या 12 महिन्यात 4000 तास वॉच टाइम किंवा शॉर्ट्सवर 10 मिलियन व्ह्यूज असायला हव्यात. चॅनल या प्रोग्राममध्ये सामिल होते. तेव्हा व्हिडिओवर येणाऱ्या जाहिरातींमधून कमाई सुरू होते. या व्यतिरिक्त क्रिएटर्सला स्पॉन्सरशिप, ब्रांड डील आणि सुपर चॅट सारखे फीचर्समधूनही कमाई करता येते.

6/7
तुम्ही 10 व्ह्यूजमागे किती कमवू शकता? : यूट्यूबवरील कमाई प्रत्येक चॅनलनुसार बदलते, जी व्हिडिओचा विषय, प्रेक्षकांचा मूळ देश आणि जाहिरातींचा खर्च यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. साधारणपणे, भारतीय क्रिएटर्स 10 हजार  व्ह्यूजमागे सुमारे 200 ते 1000 रुपये कमवू शकतात. तसंच, हा आकडा निश्चित नाही. व्हिडिओ टेक्नॉलॉजी किंवा फायनेंस यांसारख्या अशा विषयावर असेल जिथे जाहिरात करणे अधिक महाग असते, म्हणून कमाई आणखी जास्त होऊ शकते.

7/7
सतत मेहनत केल्याने मिळते यश : यूट्यूबवर यशस्वी होण्यासाठी धैर्य आणि नियमित मेहनत करणे गरजेचे असते. सुरुवातीला व्ह्यूज आणि सब्सक्रायबर हळुहळू वाढतात. पण कंटेंट चांगला आणि उपयोगी असेल तर चॅनल हे वेगाने प्रगती करू शकतं. तुम्हीही यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य धोरण आणि सततची मेहनत केल्यास तुम्ही चांगली कमाई करू शकता. एवढंच नाही तर तुम्हाला एकदिवस सिल्व्हर बटणही मिळू शकतं.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement