कटा भी और बटा भी नही? भाजपा खासदाराच्या मटण पार्टीत तुफान राडा, ताटातून नळ्याच गायब
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
BJP Mutton Party: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग उठलाय. अशात भाजपाच्या एका मटण पार्टीत मटणाच्या नळ्यांवरून झालेला वाद सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. मटण पार्टीत नुसता रस्सा वाढल्यानं लोकांचा पारा चढला...मग काय, नुसती हाणामारी आणि तुफान राडा.
advertisement
advertisement
14 नोव्हेंबरच्या रात्री भाजपाच्या एका कार्यालयात मटण पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं जवळपास हजार लोकांना निमंत्रण गेलं. त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक हजर झाले होते. सगळेजण कार्यालयात बसूनच मटणाचा आस्वाद घेत होते. सगळंकाही तोपर्यंत सुरळीत होतं, जोपर्यंत खासदाराच्या ड्रायव्हरच्या भावानं पार्टीत आलेल्या एका तरुणाला फक्त रस्सा वाढला, त्यात मटणाचा एकही पीस नव्हता. मग मात्र वारं फिरलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement