Pune: 12 व्या मजल्यावर अग्नितांडव, बचावकार्य सुरू असताना स्फोट, मुलाचा मृत्यू, पुण्यातील घटनेचे PHOTOS

Last Updated:
पुण्यातील उंड्री इथं एका सोसायटीत आग लागली. इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग लागली होती, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू असताना फ्लॅटमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. (अभिजित पोते, प्रतिनिधी)
1/7
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील उंड्री इथं एका सोसायटीत आग लागली. इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग लागली होती, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू असताना फ्लॅटमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement
2/7
मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्यातील उंड्री इथं घटना घडली. या भागातील जगदंब भवन मार्गावर मार्वल आयडियल सोसायटी आहे. ही सोसायटी १४ मजल्याची आहे. दुपारच्या सुमारास अचानक १२ व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये स्फोटाचा आवाज झाला आणि आग लागली.

3/7
बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केलं. संपूर्ण फ्लॅट आगीच्या भक्षस्थानी सापडला. सोसायटीतील रहिवाशांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.

4/7
अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून तातडीने पाच अग्निशमन वाहनं, एक उंच शिडीचं वाहन रवाना करण्यात आले होते.

5/7
 अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच होज पाईप वर नेत आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचवेळी अचानक सिलेंडर स्फोट झाला.

6/7
या स्फोटामुळे अग्निशमन दलाचे 2 जवान आणि 3 नागरिक जखमी झाले. या दुर्घटनेत एक 15 वर्ष वयाचा मुलगा मृत झाल्याची माहिती समोर आली आहे. 

जखमी नागरिकांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या स्फोटामुळे अग्निशमन दलाचे 2 जवान आणि 3 नागरिक जखमी झाले. या दुर्घटनेत एक 15 वर्ष वयाचा मुलगा मृत झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी नागरिकांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
7/7
दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेरीस आग नियंत्रणात आली. या घरामध्ये आग कशामुळे लागली, याचा तपास अग्निशमन दलाचे जवान करत आहे.

'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement