पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा जोरधार! ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
राज्यात पुढील 2 दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
सांगली जिल्ह्यात जोरधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील तूर, उडीद पिकांच्या काढणीला या पावसामुळे ब्रेक लागला आहे. मिरज, जत,तासगाव, शिराळा, आटपाडी,पलूस,कडेगाव या भागात जोरधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांगली जिल्ह्यात 25 अंश सेल्सीअस कमाल तर 20 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले,शिरोळ,करवीर,गगनबावडा,राधानगरी,कागल या तालुक्यात जोरधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूरमध्ये 27 अंश सेल्सीअस कमाल तर 22 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागात आज दुपारी जोरधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ या तालुक्यात जोरदार पाऊस पडेल. आज सोलापूरमध्ये 25 अंश सेल्सीअस कमाल तर 20 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement


