Weather Alert: दिवाळीआधी हवामानात मोठे बदल, पश्चिम महाराष्ट्राचा पारा चढला, रविवारचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत असून ऑक्टोबरमध्ये तापमानात मोठी वाढ झालीये. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
महाराष्ट्रातून मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने राज्यात 'ऑक्टोबर हीट’चा चटका वाढला आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 32 अंशांच्या पार असून आज 12 ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाच्या उघडिपीसह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यात शनिवारी 32.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात दिवसभर निरभ्र आकाशासह रात्री अंशतः ढगाळ आकाश राहील. यावेळी कमल तापमानात अंशतः वाढ होऊन पारा 33 अंशावर राहण्याची शक्यता आहे.
advertisement
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 31.7 अंश सेल्सिअस इतके राहीले. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर अंशतः ढगाळ आकाश होवून पारा 30 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी 30.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर आकाश निरभ्र राहील. यावेळी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस इतके राहिल.
advertisement
शनिवारी सोलापूर जिल्ह्यात 34.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची राज्यातील उच्चांकी नोंद झाली. आज सोलापूर जिल्ह्यात निरभ्र आकाशाची शक्यता कायम आहे. यावेळी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतके राहिल.
advertisement
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 32.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी जिल्ह्यात निरभ्र आकाशासह पारा 33 अंशावर पोहचण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement