Weather Alert : ऑक्टोबरची सुरुवातही पावसाने! महाराष्ट्रात 5 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली. अशातच आता 1 ऑक्टोबर रोजी राज्यात पुन्हा पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली. अशातच आता 1 ऑक्टोबर रोजी राज्यात पुन्हा पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पाहुयात 1 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथा परिसरात ढगाळ वातावरण राहून मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या सरी बरण्याची शक्यता आहे. या भागात शेतकऱ्यांनी नुकत्याच उभ्या राहिलेल्या खरीप पिकांवर लक्ष ठेवावे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
advertisement
advertisement
advertisement
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नसून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना यामुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. या चार जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे.
advertisement
एकूणच 1 ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे. पाच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.