Weather Alert : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, आता गारवा वाढणार, रविवारी कसं असेल हवामान?
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मागील काही दिवसात राज्यातील पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे आणि राज्यामध्ये कोरडे हवामान पाहायला मिळत आहे.
नैऋत्य मान्सूनने राज्यामधून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातील उत्तरेकडील जिल्ह्यातून मान्सूनने काढता पाय घेतला असून आगामी एक-दोन दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी फिरेल. मागील काही दिवसात राज्यातील पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे आणि राज्यामध्ये कोरडे हवामान पाहायला मिळत आहे.
advertisement
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमध्ये अधून मधून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
मराठवाड्याप्रमाणेच विदर्भामध्ये देखील पुढील चार ते पाच दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाने कोरडे हवामान पाहायला मिळणार असून कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान, नैऋत्य मान्सून राज्यातून माघारी फिरल्यानंतरही दक्षिण भारतामध्ये ईशान्य मान्सूनचा पाऊस होत असतो. या पावसाचा परिणाम म्हणून राज्यामध्ये देखील पावसाच्या हालचाली आगामी काळात पाहायला मिळू शकतात. दिवाळीच्या आसपास राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.







