एमबीए शिकलेल्या तरुणाने पुण्यात सुरू केला कोल्हापुरी भडंग, अल्पावधीतच जिंकले खवय्यांचे मन
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुणे शहर आपल्या खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. मिसळ, पाणीपुरी, वडापाव, भेळ अशा असंख्य पदार्थांच्या एक वेगळी चव असून त्यामध्ये विविधता पाहिला मिळते. सदाशिव पेठ परिसरात सुरू झालेल्या भडंग खाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. विशेष म्हणजे ही भेळ विकणारा तरुण म्हणजे एमबीए पदवीधर श्रीनाथ शिंदे, ज्याने आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या ऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कोल्हापुरी स्पेशल भेळ, कोल्हापुरी झटका भेळ, कोल्हापुरी खरडा भेळ, सुकी भेळ, रगडा भेळ, फरसाण भेळ, आणि मका भेळ. प्रत्येक प्रकारात कोल्हापुरी मसाल्याची खासियत दिसते. शेव, पापडी, फरसाण आणि भडंग या सगळ्या गोष्टी कोल्हापूरहून आणल्या जातात, ज्यामुळे त्या भेळीला अस्सल चव मिळते. या व्यवसायातून श्रीनाथला महिन्याला सरासरी एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. पुणेकरांसोबतच बाहेरून आलेले विद्यार्थी आणि पर्यटकही या भेळीच्या ठिकाणी गर्दी करत आहेत.
advertisement
श्रीनाथ म्हणतो, लोकांना चव आणि दर्जा दोन्ही मिळाला की ते पुन्हा येतात. माझा उद्देश केवळ नफा नव्हे, तर कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीचा वारसा पुण्यात पोहोचवणे हा आहे. एमबीए करून नोकरीचा मार्ग निवडण्याऐवजी व्यवसायात उतरलेल्या श्रीनाथ शिंदेने अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. त्याच्या कोल्हापुरी भडंग भेळ व्यवसायाची पारंपरिक चव, उद्योजकतेचा आत्मविश्वास आणि आधुनिक विचारसरणी या तिन्हींचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.


