Pune News: ‘गुडलक’ कॅफेचं पुन्हा बॅड लक! आधी मस्कामध्ये काच, आता अंडाभुर्जीत सापडलं झुरळ, ग्राहकांचा संताप!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune News: पुण्यातील गुडलक कॅफेचं बॅड लक सुरूच आहे. मस्कापावमध्ये काच सापडल्यानंतर आता अंडाभुर्जीत झुरळ सापडल्याचा प्रकार घडला आहे.
पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेमध्ये काही दिवसांपूर्वी बन मस्कामध्ये काच सापडली होती. हे प्रकरण संपत नाही, तोच पुन्हा एकदा गुडलक कॅफे चर्चेत आलं आहे. यावेळी मुंबई-पुणे हायवेवरील फूड प्लाझामध्ये असणाऱ्या गुडलक कॅफेच्या अंडाभुर्जीत झुरळ सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. तर कॅफेच्या स्वच्छतेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
advertisement
अंडाभुर्जीत झुरळ सापडल्यानंतर स्थानिक ग्राहकांनी संबंधित कॅफेविरोधात आवाज उठवत अन्न व औषध प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, फर्ग्युसन रस्त्यावरील मुख्य शाखेमध्ये काही दिवसांपूर्वीच अन्नात काच सापडल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित शाखेचा परवाना तात्पुरता रद्द केला होता. त्यामुळे हा कॅफे बंद आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement