साताऱ्यात वादळी पावसाची शक्यता, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात काय असेल स्थिती?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
राज्यात पावसाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 14 सप्टेंबर रोजी पावसाची काय स्थिती राहील जाणून घेऊ.
advertisement
advertisement
सातारा शहरात सायंकाळी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोरेगाव, खटाव, कराड, पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण आणि माण या तालुक्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साताऱ्यात 26 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
advertisement
advertisement
सोलापूर शहर व जिल्ह्यात आज दमदार पावसाची शक्यता आहे. करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माढा, सांगोला आदी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल असं सांगण्यात येतंय. सोलापूर मध्ये 23 अंश कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी समाधानकारक पावसाची शक्यता आहे.