जाता-जाता धुमाकूळ! पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार परतीचा पाऊस, पाहा अपडेट

Last Updated:
राज्यात परतीच्या पावासाचा जोर कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट असून इतर जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
1/7
राज्यातील विविध भागात परतीच्या पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम आहे. आज, 26 सप्टेंबर रोजी देखील पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आलाय.

advertisement
2/7
परतीच्या पावसानं पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहराला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा तसेच कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात आज संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

3/7
सातारा जिल्ह्यात देखील आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाचगणी, महाबळेश्वर आणि वाई या ठिकाणी संध्याकाळी जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सातारा जिल्ह्यात 26 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

4/7
सांगली शहरात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. रस्ते, चौकांत पाणी साचून राहिल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. आज देखील तासगाव, मिरज, कडेगाव तालुक्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर वाळवा, पलूस, मिरज तालुक्यात सोयाबीन काढणी वेळीच पावसाची संततधार सुरू झालीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पीक गमावण्याची वेळ आली आहे.

5/7
कोल्हापूर जिल्ह्यात संततधार सुरु आहे. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा तालुक्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धरणक्षेत्रातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 27 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

6/7
विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह सोलापुरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सांगोला, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

7/7
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने कमबॅक केलेलं आहे. आज अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात येतंय.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement