थोडीशी विश्रांती, पण धुमशान सुरूच! पश्चिम महाराष्ट्रात पावसाची आज काय स्थिती?

Last Updated:
गेल्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज पुन्हा पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.
1/7
राज्यात परतीच्या पासवाने गेल्या काही दिवसांत धुमाकूळ घातला आहे. पुण्या-मुंबईसह काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस झाला. आज, 27 सप्टेंबर रोजीही राज्यातील पावसाचा जोर कायम असणार आहे. पश्चिम महाराष्ट्राला आज काहीसा दिलासा असून काही जिल्ह्यांत पाऊस उसंत घेण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
राज्यात परतीच्या गेल्या काही दिवसांत धुमाकूळ घातला आहे. पुण्या-मुंबईसह काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस झाला. आज, 27 सप्टेंबर रोजीही राज्यातील पावसाचा जोर कायम असणार आहे. पश्चिम महाराष्ट्राला आज काहीसा दिलासा असून काही जिल्ह्यांत पाऊस उसंत घेण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
2/7
गेल्या 3 दिवसांत पुणे शहराला पावसाने झोडपून काढले आहे. आज देखील पुण्यात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. काही भागात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच जुन्नर, मंचर, खेड, पुरंदर, शिरूर या भागात देखील आज काही प्रमाणात पाऊस कोसळेल.

3/7
सातारा जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोरेगाव, खटाव, कराड, पाटण, वाई, जावळी महाबळेश्वर, खंडाळा, फलटण आणि माण या तालुक्यात तुफान पावसाची शक्यता आहे.

4/7
सांगली जिल्ह्यात आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. सांगली मध्ये आज 25 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

5/7
कोल्हापूर जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये देखील आज दमदार पाऊस होईल. कोल्हापूर शहरात आज 27 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

6/7
सोलापूर जिल्ह्यात काल काही भागात पावसाची उसंत पाहायला मिळाली. तर आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, सांगोला, मोहोळ या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. सोलापुरात 28 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

7/7
दरम्यान, आज पश्चिम महाराष्ट्रात पावसाची स्थिती संमिश्र स्वरुपाची असणार आहे. काही ठिकाणी पावसाने उसंत घेतल्याचे चित्र असेल. तर काही ठिकाणी वादळी आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement