साताऱ्यात वादळी पावसाची शक्यता, पश्चिम महाराष्ट्रातील अपडेट पाहिलं का?

Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. आज साताऱ्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
1/6
राज्यात गेल्या काही दिवसांत विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. आज साताऱ्यात वादळी पाऊस तर इतर जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांत विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून ऊन- खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. आज साताऱ्यात वादळी पाऊस तर इतर जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/6
पुणे शहरासह परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहील. पुणे जिल्ह्यातील हवेली, पुणे शहर, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत मध्यम ते अतिमध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात आज 28 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

3/6
सातारा शहरात जोरदार वार, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोरेगाव, खटाव, कराड, पाटण, वाई, जाओली, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण आणि माण या तालुक्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साताऱ्यात 26 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

4/6
कोल्हापूरमधील करवीर, इचलकरंजी ,गडहिंगलज , राधानगरी या भागात पावसाने उघडीप दिली आहे. आज कोल्हापूरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये 28 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

5/6
सांगली शहरात मध्यम ते अतिमध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी आकाश निरभ्र राहिलं. सांगलीत 26 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

6/6
सोलापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माढा, सांगोला आदी तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर मध्ये 26 अंश कमाल तर 20 अंश किमान तापमान असेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement