गौरी विसर्जनाला पावसाची हजेरी, पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांना IMD चा अलर्ट
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रात गौरी विसर्जनाच्या दिवशी पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
पुणे शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर कायम असणार आहे. पुण्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे गौरी-गणपतीच्या सणात नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पुण्यात 28 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान राहील.
advertisement
सातारा जिल्ह्यात पुढील 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाणे वर्तवली आहे. साताऱ्यात 24 अंश कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
advertisement


