पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं! कोल्हापूर, सांगलीत पुन्हा येणार पाऊस, पुण्याचा अंदाज काय?

Last Updated:
Weather Forecast: दिवाळीपर्यंत बरसणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्यावर पश्चिम महाराष्ट्रात थंडीची चाहुल लागली होती. परंतु, आता पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.  
1/5
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पुण्यात देखील दिवाळीनंतर थंडीची चाहुल लागली होती. परंतु, थंडीने पुन्हा हुलकावणी दिली असून किमान तापमान 22 अंशांवर गेलंय. तर कमाल तापमान तिशी पार 32 अंशांवर आहे. आज वातावरण पूर्णत: ढगाळ राहणार असून हवामान दमट असणार आहे. उद्या, 16 नोव्हेंबरला देखील पुण्यात हिच स्थिती कायम असणार आहे.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात उष्मतेचा पारा 16 अंशांपर्यंत घसरला होता. त्यात पुन्हा वाढ झाली असून 21 अंश सेल्सिअसवर गेला आहे. तर आज पुन्हा साताऱ्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

3/5
सांगली जिल्ह्यात वातावरण अंशत: ढगाळ असून दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील किमान तापमानात देखील वाढ जाली असून पारा 21 अंशांवर गेलाय. तर आज कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

4/5
कोल्हापूर जिल्ह्यातील हवामानात देखील मोठे बदल जाणवत आहेत. आज धुक्याची चादर पसरली असून जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

5/5
सोलापूर जिल्ह्यात आज संमिश्र वातावरण राहणार आहे. काही अंशी ढगाळ तर काही ठिकाणी सूर्यप्रकाशित वातावरण असेल. आज 32 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement