आजचं हवामान: पश्चिम महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट, 4 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
आज 31 मार्च रोजी पारा पातळी सरासरी 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुढील 24 तासांतील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा उच्चांक दिसत आहे. उन्हाचा चटका असह्य झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा 38- 40 अंशानदरम्यान आहे. दरम्यान भारतीय हवामान केंद्राने तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आज 31 मार्च रोजी पारा पातळी सरासरी 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुढील 24 तासांतील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आज दिनांक 31 मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्यात 7 मि.मी. सांगली व सातारा जिल्ह्यांत 8 मि.मी., सोलापूर जिल्ह्यात 5 मि.मी., पुणे जिल्ह्यात 4 मि.मी. पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तसेच वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. व वाऱ्याचा ताशी वेग 7 ते 19 कि.मी. राहील.1 एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. 2 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रला अवकाळी पाऊस झोडपणार आहे.