आजचं हवामान: पश्चिम महाराष्ट्रावर दुहेरी संकट, हवामानाची विचित्र स्थिती, 24 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Update: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. आज काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
1/7
राज्यात पावसाला पोषक हवामान असले तरी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. काही जिल्ह्यांना उष्णतेचा तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.

advertisement
2/7
पुण्यातील तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. मागील 24 तासांमध्ये 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज 17 एप्रिल रोजी कमाल तापमान 41 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहील. तर आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.

3/7
सातारा जिल्ह्यात संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहील. विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे. मागील 24 तासात साताऱ्यात 40.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासांत कमाल तापमान 41 अंश तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहिल.

4/7
सांगली जिल्हामध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असेल. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

5/7
कोल्हापूर जिल्ह्यातील तापमानात अंशतः घट दिसून येते. कमाल तापमान 38 अंश तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. मागील 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 39 अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे.तर पुढील 24 तासात आकाश निरभ्र राहील.

6/7
सोलापूर जिल्ह्यातील तापमानातील वाढ कायम असून कमाल तापमान 43 अंश तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. दिवसभरच्या वाढत्या तापमानासह अंशतः ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्‍यता आहे. सोलापूर जिल्ह्यात दिनांक 16 रोजी 42.2 तापमानाची नोंद झाली आहे.

7/7
पश्चिम महाराष्ट्रावर दुहेरी संकट घोंघावत आहे. एकीकडे तापमानात मोठी वाढ झालेली असतानाच काही ठिकाणी अवकाळी पावासाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement