आजचं हवामान: काळजी घ्या! आज सूर्यदेव आग ओकणार, पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट

Last Updated:
Weather Update: पश्चिम महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे टाळावे लागेल. पुढील 24 तासांच्या हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
1/7
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असून विदर्भातील अकोला येथे गुरुवारी उच्चांकी 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. तर पश्चिम महाराष्ट्रात देखील उन्हाचा चटका वाढला असून सोलापुरात सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअस तापामान नोंदवलं गेलंय.

advertisement
2/7
पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा पारा पुन्हा चढणार आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांत तापमान चाळीशी पारच राहणार आहे. साताऱ्यात गुरुवारी 40.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासांत कमाल तापमान 41 अंश तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील.

3/7
पुणे जिल्ह्यातील तापमान 41 अंशावर गेले असून हवामान विभागाने नागरिकांना दक्षतेचे आवाहन हवामान केले आहे. मागील 24 तासांमध्ये 41.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 40 तर किमान 20 अंश सेल्सिअस राहील.

4/7
सांगली जिल्हामध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस राहिल तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असेल. आकाश निरभ्र राहणार असून वाढत्या उष्णतेमुळे पिकांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

5/7
कोल्हापूर जिल्ह्यातील तापमानात अंशतः घट दिसून येते. कमाल तापमान 38 अंश तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. आज आकाश निरभ्र राहणार आहे. मागील 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 39 अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

6/7
सोलापूर जिल्ह्यात पारा सतत वाढतच असून कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस इतके राहील. वाढत्या उष्णतेने फळबागांवर परिणाम होत असून शेतकऱ्यांना पिकांची दक्षता घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

7/7
वायव्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून मध्य महाराष्ट्र कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होत आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement