पुण्यात थंडीचा कडाका, पश्चिम महाराष्ट्रात पारा घसरला, पाहा आज काय स्थिती?

Last Updated:
Weather Forecast: राज्यात नोव्हेंबर अखेर पुन्हा गारठा वाढला असून पुण, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झालीये. पश्चिम महाराष्ट्रात आज हवामानाची स्थिती काय राहील? जाणून घेऊ.
1/5
नोव्हेंबर अखेर राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील गारठा वाढला असून पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झालीये. शहरातील एनडीए भागात 10 अंशांपर्यंत तापमान घसरलंय. आज पुण्यात 27 अंश कमाल तर 12 अंश सेल्सिअस किमान तापमान राहण्याचा अंदाज आहे. तर वातावरण अंशत: ढगाळ राहील.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात देखील थंडीचा कडाका वाढला असून पारा 13 अंशांपर्यंत घसरला आहे. आज वातावरण दमट आणि ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

3/5
सांगली जिल्ह्यात आज संमिश्र स्वरुपाचं वातावरण राहील. काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर काही ठिकाणी सूर्यप्रकाश असणार आहे. जिल्ह्यात कोणतीही पावसाची शक्यता नाही. आज देखील थंडीची तीव्रता कायम असून किमान तापमान 17 तर कमाल 30 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

4/5
कोल्हापुरात देखील थंडी हुडहुडी भरवत आहे. पहाटे काही प्रमाणात धुक्याचे सावट जाणवत असून गारठा देखील वाढला आहे. आज संपूर्ण दिवसभर आकाश ढगाळ राहणार आहे. तापमानात देखील घट झाली असून आज कमाल तापमान 29 अंश तर किमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

5/5
सोलापूर जिल्ह्यात गारठा वाढला आहे. किमान तापमान 17 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं असून कमाल तापमान 31 अंशांवर असणार आहे. तर आज वातावरण बदललं असून सूर्यप्रकाशित तर काही अंशी ढगाळ राहणार आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement