आता बिनधास्त आवरा शेतीचं कामं, पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचं अपडेट पाहिलं का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Weather Forecast: यंदा पावसाने जास्त दिवस मुक्काम ठोकला होता. त्यामुळे हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आजचा पश्चिम महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज जाणून घेऊ.
पुणे शहरात आज दुपापर्यंत वातावरण राहणार असून दुपार नंतर ढगाळ राहणार आहे. तर कमाल आणि किमान तापमान स्थिर असून ते 32 अंश आणि 19 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आज शेतीकामांना कोणताही अडथळा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या भात, मका, कांदा पिकांची काढणी व कापूस पिकांची वेचणी सुरू ठेवावी. गहू पिकाची पेरणी करावी व हरभरा पिकांची पेरणी व पूर्व हंगामी उसाची लागवड सुरू ठेवावी.
advertisement
advertisement
सांगली जिल्ह्यात वातावरण कोरडे राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकण्यास काही अडथळा नाही. काढणीस आलेल्या भात व नाचणी पिकाची काढणी सुरू ठेवावी. गहू पिकाची पेरणी करावी व बागायती हरभरा पिकाची पेरणी सुरू ठेवावी. जिल्ह्यात आज 32 अंश कमाल तापमान कायम राहणार असून किमान तापमानात मात्र 1 अंशांची घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
कोल्हापूरमध्ये वातावरण बदललं असून मागील आठवड्यामध्ये वाढलेला तापमानाचा जोर आता ओसरला आहे. आद्रता आणि कोरडे हवामान यामुळे वांगी पिकावर तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन 25 % ई.सी. @ 4 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कोल्हापूर मध्ये आज 32 अंश कमाल तर 17 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
सोलापूरमध्ये आज समिश्र वातावरण राहील. काही अंशी ढगाळ तर काही अंशी सूर्यप्रकाशित राहणार आहे. तूर पिक फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये असल्यास आवश्यकतेप्रमाणे व उपलब्धतेनुसार पाणी द्यावे. तर सध्याच्या हवामानामुळे केळी पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे. सोलापूरमध्ये आज 33 अंश कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.