पश्चिम महाराष्ट्रात आजही जोरदार पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Mohan Najan
- local18
- Reported by:SHIVANI DHUMAL
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
पुणे शहरासह परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. पुणे जिल्ह्यातील हवेली, पुणे शहर, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव या ठिकाणी मध्यम ते अतिमध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात आज 27 अंश सेल्सीअस कमाल तर 21 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
सातारा शहरात सायंकाळी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोरेगाव, खटाव, कराड, पाटण, वाई, जाओली, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण आणि माण या तालुक्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साताऱ्यात 26 अंश सेल्सीअस कमाल तर 21 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
advertisement
advertisement


