पश्चिम महाराष्ट्रात ऊन आणि थंडीचा जोर, किमान तापमानात मोठी घट, आजचं हवामान

Last Updated:
Weather Forecast: दिवाळीनंतर पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढत आहे. आज बहुतांश जिल्ह्यात कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक दिसत आहे.
1/5
दिवाळीनंतर पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यात आकाश निरभ्र असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढत असून आज किमान तापमानात 1 अंशांची घट झालीये. त्यामुळे कमाल तापमान 32 तर किमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात देखील थंडीचा जोर वाढत आहे. दिवसा ऊन तर रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे. किमान तापमानात पुन्हा घट झाली असून आज 17 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान तिशीपार राहील.

3/5
सांगली जिल्ह्यात संमिश्र वातावरण असून ऊन तर मध्येच ढग पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा परिणाम शेती कामावर होत आहे. जिल्ह्यात आज तापमान स्थिर असून 32 अंश कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

4/5
कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरणात बदल जाणवत आहेत. सकाळी धुके, दुपारी ऊन तर रात्री हवेत गारवा जाणवतोय. आज देखील आकाश निरभ्र राहणार असून स्वच्छ सूर्यप्रकाश असणार आहे. कोल्हापूरमध्ये आज 32 अंश कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

5/5
सोलापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढत आहे. तर दुपारी उन्हाच्या कडाक्याने नागरिक हैराण आहेत. आज स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असणार आहे. सोलापूरमध्ये कमाल तापमान 33 तर किमान 17 अंश सेल्सिअस राहील.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement