कोल्हापूर, साताऱ्यात जोरधार! पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा पुन्हा अलर्ट

Last Updated:
राज्यात परतीच्या पावसाचा जोर कायम असून आज पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सातारा, कोल्हापूरसह काही ठिकाणी जोरदारा पावसाचा इशारा दिला आहे.
1/7
राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात ऑक्टोबर हिट जाणवत आहे.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यात आज 29 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

3/7
सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. साताऱ्यात 28 अंश कमाल तर 21 अंश किमान तापमान असेल.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या मेघ गर्जना व विजांचा कडकडासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर मध्ये 27 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

5/7
सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कडेगाव तालुक्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर वाळवा, पलूस, मिरज तालुक्यात भागात पावसाची संततधार होईल. सांगलीत आज 25 अंश कमाल तर 21अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

6/7
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर या ठिकाणी आज जोरदार पाऊस कोसळेल. सोलापूर मध्ये 27 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

7/7
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुढील काही दिवस पावसाची जोरदार बॅटिंग होणार आहे. काही ठिकाणी मात्र ऑक्टोबर हिट जाणवणार असल्याची शक्यता आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement