Weather Alert: काळजी घ्या! पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, पुणे ते कोल्हापूर 24 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आज अतिवृष्टीची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी दक्षतेचा इशारा दिला आहे.
1/7
राज्यात पावसाचा जोर वाढला असून कोकणसह घाटमाथ्याच्या भागात अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राधानगरी, चांदोली या धरक्षेत्रांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
मागील 24 तासात पुणे जिल्ह्यात 6.5 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानाचा पारा 25.9 अंश सेल्सिअसवर पोहोचला. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने दक्षतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच उर्वरित पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

3/7
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात हलका पाऊस झाला. सातारा परिसरामध्ये 5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस राहिल. सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज देखील पावसाची तीव्रता कायम राहणार आहे. कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात देखील पावसाची रिपरिप कायम राहण्याचा अंदाज आहे. राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाला असून स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.

5/7
सोलापूर जिल्हात मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली. कमाल तापमानाचा पारा 29.4 अंशावर पोहचला आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 28 अंशावर राहण्याची शक्यता असून सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता कायम आहे.

6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणक्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

7/7
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा रेड अलर्ट दिला आहे. तसेच राधानगरी, चांदोली धरणांतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. त्यामुळे नदीकाठावरील लोकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement