अक्षय्य तृतीया सुवर्ण मुहूर्त, तरी या दिवशी मुहूर्तावर पार पडणार नाही एकही लग्न! असं का?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
10 मे रोजी देशभरात अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल. हा केवळ सण नाही, तर वर्षातल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक सुवर्ण मुहूर्त मानला जातो. हा संपूर्ण दिवसच शुभ असल्याने या दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी वेगळा मुहूर्त पाहिला जात नाही, परंतु यंदाच्या अक्षय्य तृतीयेला मात्र एकही शुभकार्य पार पडणार नाही, कारण या काळात गुरू आणि शुक्र ग्रह अस्त अवस्थेत आहेत. (सोनाली भाटी, प्रतिनिधी / जालौर)
advertisement
ज्योतिषी पंडित भानू प्रकाश दवे यांनी सांगितलं की, 28 एप्रिलला सकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी शुक्र ग्रह मेष राशीत अस्त झाला होता. त्याचा आता 29 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून 37 मिनिटांनी मिथुन राशीत उदय होईल. तर, 7 मे रोजी रात्री 10 वाजून 8 मिनिटांनी वृषभ राशीत गुरू ग्रहाचा अस्त झाला. आता येत्या 6 जूनला त्याचा उदय होईल. तोपर्यंत कोणतंही शुभकार्य पार पडणार नाही.
advertisement
advertisement
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.