यंदाचा गुढीपाडवा 4 राशींचा, मराठी नववर्ष ठरेल यशाची नांदी, नशीब फळफळेल सुखांनी!

Last Updated:
यंदा मराठी नववर्षाची सुरुवात अत्यंत दुर्मीळ योगांनी होणार आहे. ज्या दिवशी गुढीपाडवा सण साजरा होईल, त्या दिवशी सूर्य, बुध, चंद्र, शनी आणि राहू हे मोठे ग्रह मीन राशीत विराजमान असणार आहेत. ग्रहांच्या या मोठ्या युतीचा भरभरून आशीर्वाद काही राशींच्या व्यक्तींना मिळेल. ग्रहांच्या कृपेनं या व्यक्तींसाठी संपूर्ण वर्ष सुखात सरेल, असं प्रसिद्ध ज्योतिषांनी सांगितलं आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
1/7
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मार्च रोजी सर्वत्र गुढीपाडवा सण साजरा होईल आणि त्यासोबतच उजाडेल नववर्ष. या नव्या वर्षात असे काही दुर्मीळ योग जुळून येणार आहेत की, त्याचा सकारात्मक प्रभाव काही विशिष्ट राशींच्या व्यक्तींवर पडणार आहे.

advertisement
2/7
30 मार्च रोजी साजरा होणारा गुढीपाडवा सण काही राशींच्या व्यक्तींसाठी अगदी सुखाची नांदी ठरेल. कारण या दिवशी असे काही दुर्मीळ योग जुळून येणार आहेत की, त्यातून या राशींच्या व्यक्तींचं नशीब पार चांदणीसारखं उजळून निघेल. या वर्षात नक्कीच काहीतरी मोठं घडेल. देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे.

3/7
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष खूप सकारात्मक असेल. नोकरीच्या शोधात असाल तर आता मनासारखी संधी मिळू शकेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदी वातावरण नांदेल. वडिलोपार्जित संपत्तीबाबत जे काही वाद असतील ते आता मिटतील.

4/7
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष अतिशय सकारात्मक असेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. नवं काम सुरू करण्यासाठी अनुकूल काळ असेल. मालमत्तेबाबत धनलाभाचा योग आहे. मनासारखा प्रवास होईल. भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. हाती घ्याल त्या प्रत्येक कार्यात यश लाभेल.

5/7
धनू राशीच्या व्यक्तींसाठीही हे वर्ष खूप खास असेल. करियरबाबत प्रगतीचा काळ सुरू होईल, एखादी महत्त्वाची नवी जबाबदारी मिळेल, जी भविष्याच्या दृष्टीनं फायद्याची ठरेल. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये निकाल आपल्या बाजूनं लागण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

6/7
नववर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत सुखद असेल. जुनी रखडलेली कामं आता मार्गी लागली. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. नोकरीत पगारवाढ होण्याची किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. डोक्यावरील कर्जाचं ओझं आता हलकं होऊ शकतं. तसंच समाजात मान-सन्मान वाढेल.

7/7
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement