हळदीचा टिळा लावल्याने बदलणार तुमचं नशीब, आहेत खूपच महत्त्वाचे फायदे, एकदा वाचाच..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सनातन धर्मात हळदीचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा वापर केला जातो. भगवान गणेश आणि भगवान विष्णुलाही हळदी विशेष आवडते. प्राचीन काळापासून लोक हळदीचा टिळा लावत आल्या आहेत. मान्यतेनुसार, हळदीचा टिळा लावल्याने माणसाची पापे नष्ट होतात. तसेच न होणारी कामेही पूर्ण करतात. (दुर्गेश सिंग राजपूत/नर्मदापुरम, प्रतिनिधी)
ज्योतिषाचार्य पंडित पंकज पाठक यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कोणतेही शुभ कार्य करण्याआधी हळदीचा टिळा लावावा. ते कार्य यशस्वी होईल. विशेष करुन आपल्याला माहिती आहे की, लग्नादरम्यान हळदीचा टिळा लावून शुभ कार्याची सुरुवात केली जाते. वर आणि वधूलाही हळद लावली जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement