Pumpkin Seed Milk : महागडं बदामाचं दूध सोडा, घरी 5 मिनिटांत बनवा प्रोटीन रिच भोपळ्याच्या बियांचं दूध! पाहा पद्धत
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to make pumpkin seed milk : बदाम दूध खूप महाग असतं. अगदी 250 रुपये लिटरपर्यंत. या किमती सर्वांनाच परवडतात अशा नाही. अशावेळी तुम्ही तुमची प्रोटीनची कमतरता आई दूध पिण्याचा आनंद एका सोप्या पध्दतीने मिळवू शकता.
मुंबई : हल्ली बरेच लोक गायीचं किंवा म्हशीचं दूध पीत नाही. यातील बऱ्याच लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्सची समस्या असते. तर काही लोक व्हीगन होण्याचा पर्याय निवडतात. म्हणजेच ही लोक मांसाहारासोबत सर्व दुग्धजन्य उत्पादनंही खाणं सोडतात. म्हणून असे लोक बदामाचे दूध किंवा सोया मिल्क यांचा पर्याय निवडतात. मात्र बदाम दूध खूप महाग असतं. अगदी 250 रुपये लिटरपर्यंत.
या किमती सर्वांनाच परवडतात अशा नाही. अशावेळी तुम्ही तुमची प्रोटीनची कमतरता आई दूध पिण्याचा आनंद एका सोप्या पध्दतीने मिळवू शकता. भोपळ्याच्या बियांचं दूध तुम्ही घर अगदी सहज कमी वेळेत आणि कमी पैशात बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला हे दुष्ट कसं बनवायचं हेच सांगत आहोत. हे दूध बनवण्याची सोपी पद्धत fit.khurana या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे.
advertisement
भोपळ्याच्या बियांचं दूध बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- 4 टेबलस्पून भोपळ्याच्या बिया
- 1 टेबलस्पून तीळ
- 750 मिली पाणी
भोपळ्याच्या बियांचं दूध बनवण्याची सोपी पद्धत.
- यासाठी तुम्हाला भोपळ्याच्या बिया आणि तीळ पाण्यात 4-6 तास किंवा रात्रभर भिजवावे लागतील.
- नंतर या भिजवलेल्या बिया मिक्सरमध्ये घ्या आणि त्यामध्ये 750 मिली पाणी टाका.
advertisement
- आता हे मिश्रण ब्लेंडरमध्ये चांगल फिरवा.
- सुमारे 30-40 सेकंद हे गुळगुळीत होईल.
- यानंतर हे दूध मखमलच्या कापडाने किंवा बारीक गाळणीने गाळून दुध बाजूला काढून घ्या.
- या दुधामध्ये मध, दालचिनी पावडर आणि सी मीठ मिसळा.
- दूध एका काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे ते 2-3 दिवस चांगलं राहतं.
advertisement
- मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दूध तुम्हाला नॉर्मल किंवा थंडच प्यावं लागेल. याला अजिबात गरम करू नका.
advertisement
अशाप्रकारे हे दूध बनून तयार होतं. दुध गाळल्यानंतर उरलेल्या लगद्याचा वापर तुम्ही पॅनकेक्स, एनर्जी बाइट्समध्ये करू शकता. किंवा याच्यासोबत तुम्ही स्मूदीदेखील बनवू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 1:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Pumpkin Seed Milk : महागडं बदामाचं दूध सोडा, घरी 5 मिनिटांत बनवा प्रोटीन रिच भोपळ्याच्या बियांचं दूध! पाहा पद्धत







