Hanuman Jayanti 2025: हेमा मालिनींच्या स्वप्नात आले महारुद्र मारुती, महाराष्ट्रातील या मंदिराची अशीही आख्यायिका
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Hanuman Jayanti 2025: प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या स्वप्नात महारुद्र मारुती आले, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर त्या अमरावतीतील हनुमान मंदिरात दर्शनासाठी नेहमी येत असतात.
महाराष्ट्रातील गावा-गावात हनुमान मंदिर पाहायला मिळतात. त्या मंदिराशी काही खास आख्यायिका देखील जोडल्या गेलेल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील जहांगीरपूर येथे स्वयंभू आणि जागृत हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराची अख्यायिका ही श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता यांच्याशी जोडली गेली असल्याचे तेथील नागरिक सांगतात.
advertisement
advertisement
जहांगीरपूर येथील पुजारी परमानंद पांडे सांगतात की, द्वापारयुगात जेव्हा श्री कृष्णाचा जन्म झाला तेव्हा हनुमान त्यांच्या भेटीसाठी मथुरेत गेले होते. त्यानंतर त्यांनी रुख्मिणी मातेची भेट घेण्याचे ठरवले आणि ते अमरावती जिल्ह्यांतल कौंडण्यपूर येथे आले. रुक्मिणी मातेची भेट घेतल्यानंतर मातेनी त्यांना याच भागात वास्तव्य करण्यास सांगितले. तेव्हा हनुमान हे कौंडण्यपूर जवळच असलेल्या जहांगीरपूर येथे येऊन वसले, अशी अख्यायिका आहे.
advertisement
advertisement
जमिनीत खोदकाम करण्यास सुरवात केली. त्यातून हनुमानाचा भव्य मुखवटा निघाला. जेव्हा ही माहिती गावात पसरली तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झाले. त्यानंतर भाविक याठिकाणी दर्शनाला येऊ लागले, असेही पुजारी सांगतात. त्यानंतर याठिकाणी लाकडी छत तयार करण्यात आले. हळूहळू या मंदिराची ख्याती वाढली. लोकांच्या सहकार्यातून भव्य मंदिर उभारण्यात आले.
advertisement
advertisement
हेमा मालिनी यांनी रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता. विशेष म्हणजे यासाठी संपूर्ण निधी हा हेमा मालिनी यांनी दिल्याचेही पुजारी सांगतात. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन आणि मारुती दर्शन या दोन्हीसाठी हेमा मालिनी 1991 मध्ये येथे आल्या होत्या. त्यानंतरही अनेकवेळा त्यांनी महारुद्र मारोतीचे दर्शन घेतले, असेही पुजारी सांगतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)