तब्बल 24 वर्षांनी असं घडलं, मे आणि जूनमध्ये लग्नासाठी एकही शुभ मुहूर्त नाही!

Last Updated:
मे महिना लग्नसराईचा असतो, कारण शाळा-कॉलेजला सुट्टी पडते आणि मोठी माणसं जरा आराम करण्यासाठी सुट्टी घेतात. परंतु यंदा मात्र मे महिन्यात कोणत्याच अंगणात सनई-चौघड्याचे सूर घुमणार नाहीत. शिवाय जूनही कोरडाच जाईल, कारण या दोन्ही महिन्यांमध्ये लग्नासाठी एकही शुभ मुहूर्त नाही. असं तब्बल 24 वर्षांनी यंदा घडलंय. (मनमोहन सेजू, प्रतिनिधी / बाडमेर)
1/5
28 एप्रिलला शुक्र ग्रह अस्त होणार असल्याने मे आणि जून महिन्यात एकही विवाह मुहूर्त नाही. त्यामुळे आता थेट 2 जुलैनंतरच लग्न होतील. तसंच 16 जुलैपासून 12 नोव्हेंबरपर्यंत चतुर्मास असल्याने तेव्हासुद्धा लग्नासाठी शुभ मुहूर्त नाहीये.

advertisement
2/5
असं तब्बल 24 वर्षांनंतर पहिल्यांदा झालंय की, मे आणि जून महिन्यात लग्नासाठी एकही मुहूर्त नाही. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो जो 10 मे रोजी आहे. त्यामुळे नंतर जास्त मुहूर्त नसल्याने या दिवशी अनेकजण लग्नगाठ बांधतील.

3/5
असं म्हणतात की, भगवान विष्णू चतुर्मासात निद्रा मुद्रेत असतात. म्हणूनच या 4 महिन्यांमध्ये विवाह करत नाहीत. 12 नोव्हेंबरला प्रबोधिनी एकादशीपासून विवाह मुहूर्तांना पुन्हा सुरूवात होईल, जे 14 डिसेंबरपर्यंत असतील. 

4/5
 ज्योतिषी पंडित ओमप्रकाश जोशी सांगतात की,  अस्त झाल्यानंतर विहीर खोदली जात नाही, लग्न, साखरपुडा किंवा गृहप्रवेश केला जात नाही. कारण शुक्र हा असा ग्रह आहे, ज्याशिवाय  कार्य करत नाहीत. शुक्र हा ऊर्जेचा ग्रह मानला जातो.
ज्योतिषी पंडित ओमप्रकाश जोशी सांगतात की, शुक्र अस्त झाल्यानंतर विहीर खोदली जात नाही, लग्न, साखरपुडा किंवा गृहप्रवेश केला जात नाही. कारण शुक्र हा असा ग्रह आहे, ज्याशिवाय शुभ कार्य करत नाहीत. शुक्र हा ऊर्जेचा ग्रह मानला जातो.
advertisement
5/5
 (सूचना : येथे दिलेली माहिती  श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement