IPL Auction आधी मुंबई इंडियन्स मोठा धक्का देणार, 4 खेळाडूंना बाहेर करणार! एकाचं नाव धक्कादायक
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 साठीचा लिलाव 15 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. त्याआधी 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व टीमना त्यांनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
रॉबिन मिन्झ याला मुंबईने 65 लाख रुपयांच्या किंमतीमध्ये विकत घेतलं, पण त्याला खेळण्याची फार संधी मिळाली नाही. रॉबिन मिन्झने 2025 च्या मोसमात 2 सामन्यांमध्ये 6 रन केल्या. मिन्झला रिलीज करून मुंबई बॅकअप विकेट कीपर म्हणून दुसऱ्या खेळाडूचा विचार करू शकते. रेयान रिकलटन हा मुंबईचा पहिल्या पसंतीचा विकेट कीपर आहे.
advertisement
advertisement
मुजीब उर रहमानने 2025 च्या आयपीएलमध्ये फक्त एक मॅच खेळली, ज्यात त्याने 2 ओव्हरमध्ये 28 रन दिले, यानंतर मुजीबला एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल लिलावाआधी मुजीबला रिलीज करून घझनफरला रिटेन करण्याची संधी मुंबईकडे आहे. मुजीबने वेगवेगळ्या आयपीएल टीमकडून खेळताना 20 सामन्यांमध्ये 8.34 च्या इकोनॉमी रेटने 20 विकेट घेतल्या आहेत.
advertisement
advertisement