रोहित-विराटची रिटायरमेंट, पण T20 वर्ल्ड कप खेळलेल्या 5 जणांना No Entry, हिटमॅनला बनवलं होतं चॅम्पियन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिल आणि जितेश शर्मा यांना टीममधून बाहेर करण्यात आलं आहे, तर इशान किशन आणि रिंकू सिंग यांची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विराट कोहली आणि रोहित शर्माप्रमाणेच टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जडेजानेही मागच्या टी-20 वर्ल्ड कप फायनलनंतर रिटायरमेंटची घोषणा केली होती. मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये जडेजाला 5 इनिंगमध्येच बॅटिंग मिळाली, यात त्याने 35 रन केले, तसंच 8 मॅचमध्ये त्याला फक्त एक विकेट मिळाली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद सिराज ग्रुप स्टेजच्या 3 मॅचमध्ये खेळला, यात त्याला आयर्लंडविरुद्ध फक्त एक विकेट मिळाली, पण त्याने फार रनही दिल्या नाहीत. ग्रुप स्टेजनंतरच सिराज टीममधून बाहेर झाला आणि कुलदीप यादवला संधी दिली गेली. मोहम्मद सिराजला यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळालेलं नाही.








