Vaibhav Suryavanshi : 5,14,13... वैभव सूर्यवंशीचे 'बारा' वाजले, भारतात परत येताच ग्रह फिरले!

Last Updated:
विरोधी टीमच्या बॉलरना घाम फोडणाऱ्या वैभव सूर्यवंशीला अचानक काय झालं? हे विचारायचं कारण म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये वैभव सूर्यवंशीची झालेली अवस्था.
1/6
बिहारचा 14 वर्षांचा स्फोटक बॅटर वैभव सूर्यवंशी आतापर्यंत प्रत्येक क्रिकेट रसिकाला माहिती आहे. लहान वयातच वैभव सूर्यवंशीला जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे.

advertisement
2/6
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 35 बॉलमध्ये शतक ठोकले, यामुळे वैभव सूर्यवंशी आणखी चर्चेत आला.

3/6
अलीकडील रायझिंग स्टार्स आशिया कपमध्येही सूर्यवंशीची बॅट तळपली. वैभवने युएईविरुद्ध 42 बॉलमध्ये 144 रन केल्या, यात त्याने 11 फोर आणि 15 सिक्स मारले. पण, भारताच्या स्थानिक टी-20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीची बॅट पूर्णपणे शांत आहे.

4/6
30 नोव्हेंबर रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर बिहार आणि जम्मू आणि काश्मीर यांच्यात ग्रुप स्टेजचा सामना झाला. डावाची सुरुवात करताना वैभव सूर्यवंशी 7 बॉलमध्ये अवघ्या 5 रनवर आऊट झाला. जम्मू आणि काश्मीरचा फास्ट बॉलर आकिब नबीने त्याला बोल्ड केलं.

5/6
सूर्यवंशी या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अपयशी ठरला आहे. याआधी चंडीगढविरुद्ध तो 14 रनवर आणि मध्य प्रदेशविरुद्ध 13 रनवर आऊट झाला होता. आयपीएल 2026 च्या लिलावाआधी राजस्थानने वैभवला रिटेन केलं आहे.

6/6
या सामन्यात जम्मू-काश्मीरने टॉस जिंकून बिहारला पहिले बॅटिंगला बोलावलं. यानंतर जम्मू-काश्मीरने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 159 रन केले. 160 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बिहारने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 125 रन केल्या, त्यामुळे बिहारचा 34 रननी पराभव झाला. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतल्या या मोसमातला बिहारचा हा सलग तिसरा पराभव आहे.

Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement