Virat Kohli : नरसिंहाने हिरण्यकशपूचा वध केला, तिथेच विराट का गेला... काय आहे सिंहाचलम मंदिराचं रहस्य?

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे सीरिज संपल्यानंतर विराट कोहलीने विशाखापट्टणमच्या प्रसिद्ध सिंहाचलम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
1/7
विराट कोहलीने सीरिजच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये शतक ठोकलं, तर तिसऱ्या सामन्यात त्याने नाबाद अर्धशतक केलं. या कामगिरीबद्दल विराट कोहलीला प्लेअर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं.

advertisement
2/7
रांचीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात विराटने 135 रन केले, या सामन्यात भारताचा विजय झाला. पण रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात 102 रनची खेळी करूनही भारताला पराभव पत्करावा लागला. यानंतर विशाखापट्टणममध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात विराटने नाबाद 65 रन केले. सीरिजच्या 3 सामन्यांमध्ये मिळून विराटच्या 302 रन झाल्या.

3/7
वनडे सीरिज संपल्यानंतर भारतीय खेळाडू त्यांच्या घरी गेले, पण विराट मात्र विशाखापट्टणममध्येच थांबला. रविवारी विराट कोहलीने विशाखापट्टणमच्या प्रसिद्ध सिंहाचलम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. विराटच्या मंदिर दर्शनाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

4/7
विशाखापट्टणमच्या सिंहाचलम मंदिरामध्ये भगवान नरसिंहाची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार भक्त प्रल्हादाने नरसिंह भगवानाचं हे मंदिर बनवलं आहे. याचठिकाणी राक्षस राजा हिरण्यकशपूचा वध करण्यासाठी नरसिंहाने अवतार घेतला होता.

5/7
हिरण्यकशपूचा वध केल्यानंतरही नरसिंहाचा राग शांत होत नव्हता, म्हणून भक्त प्रल्हादाने नरसिंहावर चंदनाचा लेप लावला होता. तेव्हापासून आजतागायत सिंहाचलम मंदिरामधल्या नरसिंहाच्या मूर्तीवर दररोज चंदनाचा लेप लावला जातो.

6/7
नरसिंह भगवान विष्णू यांचा चौथा अवतार मानला जातो. भगवान विष्णू यांनी त्यांचा भक्त प्रल्हाद याचं संरक्षण करण्यासाठी अर्ध सिंह आणि अर्ध मनुष्य रूपी अवतार धारण केला आणि हिरण्यकशपूचा वध केला. भगवान विष्णू यांचा नरसिंह अवतार अत्यंत रौद्र मानला जातो.

7/7
सिंहाचलम मंदिरामध्ये वर्षातून एकदाच भगवान नरसिंहाचं वास्तविक रूपातलं दर्शन मिळतं. अक्षय तृतियेच्या दिवशी नरसिंहाच्या मूर्तीवरील चंदनाचा लेप हटवला जातो, ज्याला चंदनोत्सव म्हणलं जातं. याच दिवशी भगवान नरसिंह यांचं निजरूप दर्शन घ्यायचं सौभाग्य भक्तांना मिळतं.

Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement