Success Story: 5 हजारांचं कर्ज काढून सुरू केला व्यवसाय, 2 रुपयाच्या प्रोडक्टने कसं केलं अब्जाधीश?

Last Updated:
रामचंद्रन यांनी त्रिशूरमधून सुरू केलेली ज्योती लॅब्स आज १७,००० कोटींच्या मार्केट कॅपसह उजाला व्हाईटनर, हांको, मिस्टर व्हाईट, एक्सो यांसारखी उत्पादने देशभर लोकप्रिय केली.
1/7
आतापर्यंत आपण यशस्वी उद्योजकांच्या अनेक कथा वाचल्या आणि ऐकल्या असतील, रामचंद्रन यांनी आपला व्यवसाय लाखो रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू केला नाही, ना त्यांनी कोणते महागडे उत्पादन बाजारात आणले. देशातील प्रत्येक घरात केवळ १ किंवा २ रुपयांच्या उत्पादनासह प्रवेश करून त्यांनी आज हजारो कोटी रुपयांचे मोठे व्यावसायिक साम्राज्य उभं केलं.

advertisement
2/7
केरळमधील त्रिशूर इथे रहिवासी असलेले रामचंद्रन यांचा हा प्रवास त्यांच्या शालेय जीवनापासून सुरू होतो. त्यांनी सेंट थॉमस कॉलेजमधून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर एक अकाउंटंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अकाउंटंटची नोकरी चांगली असली तरी, त्यांचे स्वप्न पहिल्यापासूनच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे होते. रामचंद्रन यांना नेहमीच काहीतरी नवीन आणि सर्जनशील उत्पादन बनवण्याचा ध्यास होता. सुरुवातीपासूनच, त्यांना कपडे धुण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे साधन बनवायचे होते.

3/7
रामचंद्रन हे त्यांच्या घरातील स्वयंपाकघरातच कपडे धुण्याचे 'फॅब्रिक व्हाईटनर' बनवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी अनेकवेळा प्रयत्न केले, पण त्यांना वारंवार अपयश आले. शेवटी, एका मासिकातील लेखाने त्यांना त्यांच्या यशाचे नेमके सूत्र दिले. या लेखात कपड्यांना चमकदार बनवणारे जांभळे-पांढरे रंगद्रव्य कसे बनवायचे, याची माहिती देण्यात आली होती.

4/7
या लेखाच्या आधारावर, रामचंद्रन यांनी एक वर्ष अथक प्रयत्न केले आणि शेवटी त्यांना 'व्हाईटनर' बनविण्यात यश आले. 'व्हाईटनर' बनवण्याचा फॉर्म्युला तयार झाल्यानंतर, रामचंद्रन यांनी १९८३ मध्ये केवळ  ५,००० रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर एक छोटी लॅब सुरू केली. त्यांनी आपल्या मुलीच्या नावावर या लॅबचे नाव 'ज्योती' ठेवले आणि लहान स्तरावर कारखान्याची सुरुवात केली.

5/7
सुरुवातीला त्यांनी काही इतर उत्पादनेही बनवली, पण
सुरुवातीला त्यांनी काही इतर उत्पादनेही बनवली, पण "उजाला सुप्रीम लिक्विड फॅब्रिक व्हाईटनर" नावाच्या उत्पादनाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. हे स्वस्त आणि परिणामकारक उत्पादन देशभरात लगेचच पसंत पडले आणि प्रत्येक मध्यमवर्गीय घराचा अविभाज्य भाग बनले. रामचंद्रन यांची कंपनी आणि त्यांची उत्पादने सुरुवातीला दक्षिण भारतात यशस्वी झाली. त्यानंतर १९९७ मध्ये त्यांनी उत्तर भारतात आपली उत्पादने वाढवायला सुरुवात केली.
advertisement
6/7
हळूहळू, कंपनीची उत्पादने देशभर लोकप्रिय झाली. जवळपास एक दशकाच्या अथक परिश्रमानंतर, रामचंद्रन यांच्या 'ज्योती लॅब्स'च्या उत्पादनांनी त्यांचे नशीब बदलले. आज त्यांची कंपनी आणि उत्पादने संपूर्ण देशभर लोकप्रिय आहेत. 'ज्योती लॅब्स'चे आजचे मार्केट कॅप सुमारे  १७,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

7/7
'उजाला व्हाईटनर' नंतर, रामचंद्रन यांच्या कंपनीने (ज्योती लॅब्स) देशभरात लोकप्रिय असलेली अनेक उत्पादने बाजारात आणली. यात 'हांको', 'मिस्टर व्हाईट', 'मोर लाईट', 'एक्सो' आणि 'प्रिल' (डिश वॉश), तसेच 'मार्गोज', 'नीम' (पर्सनल केअर), 'मॅक्सो', 'टी-शाईन' आणि 'माया अगरबत्ती' अशा अनेक प्रसिद्ध उत्पादनांचा समावेश आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement