WhatsApp यूझर्ससाठी सिक्योरिटी वॉर्निंग जारी! एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारत सरकारने WhatsApp यूजर्ससाठी एक महत्त्वाचा सुरक्षा इशारा जारी केला आहे. जर तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
नवी दिल्ली : या आठवड्यात, भारत सरकारने व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप यूझर्सना 'उच्च-सुरक्षा' चेतावणी जारी केली आहे. 9 एप्रिल रोजी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) ने त्यांच्या पीसीवर डेस्कटॉप अ‍ॅप इन्स्टॉल केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप यूझर्सना 'उच्च-सुरक्षा' चेतावणी जारी केली.
advertisement
advertisement
advertisement
या सुरक्षा अलर्टचा सर्वात मोठा निष्कर्ष असा आहे की, जर हॅकर्सनी या त्रुटींचा फायदा घेतला तर व्हॉट्सअ‍ॅप यूझर्सना स्पूफिंग हल्ल्यांना सामोरे जावे लागू शकते. CERT-In नोटमध्ये म्हटले आहे की, 'ही त्रुटी MIME टाइप आणि फाइल एक्सटेंशनमधील चुकीच्या कॉन्फिगरेशनमुळे उद्भवते. ज्यामुळे अटॅचमेंट उघडण्यात अडचण येते. सायबर अटॅकर या त्रुटीचा फायदा घेऊन एक हानिकारक अटॅचमेंट तयार करू शकतो जो WhatsApp मध्ये मॅन्युअली उघडल्यावर अनियंत्रित कोड चालवू शकतो.'
advertisement
हा सुरक्षा धोका प्रामुख्याने विंडोज पीसीवर व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप अ‍ॅप वापरणाऱ्या यूझर्सशी संबंधित आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की 2.2450.6 च्या आधीच्या विंडोजसाठी व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉपच्या व्हर्जन या बनावट हल्ल्यांना बळी पडतात. हे टाळण्यासाठी, तुमचे व्हॉट्सअ‍ॅप ताबडतोब अपडेट करा.









