फिरायला गेलं होतं कपल; रस्त्यात दिसलं असं काही बायको नवर्यालाही सोडून पळाली
- Published by:Priya Lad
Last Updated:
Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर r/weird नावाचा एक गट आहे, ज्यावर लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विचित्र गोष्टींचा उल्लेख करतात. अलीकडेच एका व्यक्तीने त्याचा आणि त्याच्या पत्नीचा एक अनुभव सांगितला ज्याने सर्वांनाच धक्का बसला.
advertisement
advertisement
advertisement
व्यक्तीने आपल्याला ही बाहुली घरी घेऊन जायची होती, पण त्याच्या पत्नीने त्याला सक्त नकार दिल्याचं म्हटलं. बाहुली पाहून बायकोला घाम फुटला. हातात बाहुली पकडलेल्या नवर्या पासूनही ती दूर पळू लागली, जणू तिला भूत दिसलं. व्यक्तीने सांगितलं, मला ती माझ्यासोबत घरी घेऊन जायची होती, पण माझी पत्नी घाबरली आणि स्पष्टपणे म्हणाली ती बाहुली कोणत्याही किमतीत घरी घेऊन जाणार नाही.
advertisement
या पोस्टवर लोकांनी कमेंट करत ही वूडू डॉल असल्याचं सांगितलं. काळी जादू करण्यासाठी या बाहुल्या वापरल्या जातात. बाहुलीला माणूस समजून तिच्यावर जादू केली जाते, त्याचा परिणाम माणसावरही दिसून येतो, असं मानलं जातं. या बाहुलीवर सुया टोचल्या जातात किंवा विविध प्रकारची जादू केली जाते. लोक म्हणाले की त्याला घरी घेऊन जाणे ही सर्वात मोठी चूक असेल. पत्नीने घेतलेल्या निर्णयाला अनेकांनी समर्थन दिले.








