Snake Fact : सापांना माणसांचे चेहरे ओळखता येतात? रिसर्चमधून आश्चर्यचकीत करणारा खुलासा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सापांबद्दल अनेक गैरसमजदेखील पसरलेले आहेत. जसं की साप दूध पितो, बदला घेतो, किंवा वर्षानुवर्षं एखाद्याला ओळखून ठेवतो. अशाच अनेक समजुतींमागचं खरं विज्ञान समजण्यासाठी जगभरातील संशोधक सतत अभ्यास करत असतात.
सापांविषयी नेहमीच लोकांच्या मनात भीती आणि कुतूहल दोन्ही असतं. जगभरात हजारो प्रजातींचे साप आढळतात. त्यांपैकी काही अतिशय विषारी आणि प्राणघातक आहेत, तर काही पूर्णपणे निरुपद्रवी. पण या सापांबद्दल अनेक गैरसमजदेखील पसरलेले आहेत. जसं की साप दूध पितो, बदला घेतो, किंवा वर्षानुवर्षं एखाद्याला ओळखून ठेवतो. अशाच अनेक समजुतींमागचं खरं विज्ञान समजण्यासाठी जगभरातील संशोधक सतत अभ्यास करत असतात.
advertisement
advertisement
पृथ्वीवरचे 3,000 पेक्षा जास्त सापांचे प्रकारपृथ्वीवर सुमारे 3,000 हून अधिक प्रजातींचे साप आहेत. त्यांपैकी अत्यल्पच साप खरोखर विषारी आणि माणसासाठी घातक असतात. बहुतेक सापांचा विष मानवी शरीरावर परिणाम करत नाही. मात्र भूक लागल्यास किंवा धोका जाणवल्यास साप हल्ला करतात. ही त्यांची नैसर्गिक प्रतिक्रिया असते.
advertisement
सापांची स्मरणशक्ती किती तीव्र आहे?पूर्वी शास्त्रज्ञांचा समज होता की सापांची स्मरणशक्ती मर्यादित असते. पण PubMed मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार हे मत चुकीचं ठरलं. संशोधनात आढळलं की सापांमध्ये अनुकूल बुद्धिमत्ता (Cognitive Flexibility) असते. ते स्वतःच्या जगण्यासाठी आवश्यक माहिती म्हणजेच अन्न, गंध, सुरक्षित ठिकाणं आणि धोका असलेल्या भागांची ओळख लक्षात ठेवू शकतात.
advertisement
उदाहरणार्थ, कॉर्न स्नेक्स (Corn Snakes) वर झालेल्या प्रयोगात दिसून आलं की त्यांनी भूलभुलैयामध्ये (maze) योग्य मार्ग ओळखून आश्रय आणि अन्न मिळवण्याचं ठिकाण शोधलं. आणि जिथं पूर्वी त्यांना ताण किंवा धोका जाणवला होता, त्या जागी पुन्हा न जाण्याची प्रवृत्ती दाखवली हेच त्यांच्या स्मरणशक्तीचं पुरावं आहे.
advertisement
मग आता प्रश्न असा की साप माणसांना ओळखतात का?सस्तन प्राण्यांप्रमाणे साप माणसांचा चेहरा ओळखू शकत नाहीत, कारण त्यांच्या मेंदूमध्ये neocortex हा भाग नसतो जो चेहऱ्याची ओळख आणि भावनिक स्मरणशक्तीसाठी जबाबदार असतो. परंतु साप गंध (smell) आणि कंपन (vibrations) यांच्या माध्यमातून आपल्या आसपासच्या जगाला ओळखतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सर्वात बुद्धिमान साप किंग कोब्राया पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान साप म्हणून किंग कोब्रा ओळखला जातो. त्याच्यात गंधाच्या माध्यमातून ओळखीचे लोक ओळखण्याची क्षमता असल्याचं मानलं जातं. संशोधकांच्या मते, तो आपल्या परिस्थितीनुसार वर्तन बदलतो. म्हणजेच प्रत्येक वेळी आक्रमक राहत नाही, तर शत्रूच्या ताकदीनुसार आपली रणनीती ठरवतो.


