महाराष्टातलं असं गाव, जिथे भरते चक्क मेंढ्यांची यात्रा, येतात नवरी सारख्या नटून!

Last Updated:
या गावामध्ये चक्क शेळ्या मेंढ्यांची यात्रा भरते. फार पूर्वीपासून ही शेळ्या-मेंढ्यांच्या यात्रेची परंपरा असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
1/7
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी तालुक्याच्या गावामध्ये चक्क शेळ्या-मेंढ्यांची यात्रा भरते. फार पूर्वीपासून ही शेळ्या-मेंढ्यांच्या यात्रेची परंपरा असल्याचे आटपाडीतील ग्रामस्थ सांगतात.

advertisement
2/7
दरवर्षी ग्रामदैवत श्री उत्तरेश्वराच्या उत्सवानिमित्त कार्तिक पौर्णिमेला ही शेळ्या-मेंढ्यांची यात्रा भरते. यंदाही आटपाडी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये जनावरांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

3/7
आटपाडीतील या प्रसिद्ध यात्रेमध्ये पूर्वी माणदेशी खिलार बैलांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत होती. अलीकडच्या दोन-चार वर्षांमध्ये गाई म्हशी आणि खिलार बैलांऐवजी शेळ्या आणि मेंढ्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. अलीकडे माडग्याळी मेंढ्या या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत.

4/7
बेळगाव सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर सह कर्नाटक राज्यातून अनेक व्यापारी आणि शेतकरी शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी विक्रीसाठी आले आहेत. शेळ्या-मेंढ्यांची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा आहे.

5/7
यामुळे पशुपालकांना दर्जेदार शेळ्या-मेंढ्या खरेदी करता येतात. या यात्रेतून लाखोंची उलाढाल होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

6/7
माणदेशातील प्रसिद्ध माडग्याळी मेंढ्या या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. अडीच लाखांपासून 51 लाखांपर्यंत या मेंढ्यांच्या किंमती आहेत. तीन दिवसाच्या कोपरापासून मोठ्या मेंढ्यांपर्यंत खरेदी-विक्री होते आहे.

7/7
रंगवलेल्या, सजवलेल्या शेळ्या-मेंढ्यांनी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संपूर्ण आवार फुलले आहे. हौशी मेंढपाळ जातिवंत आणि दर्जेदार शेळ्या-मेंढ्यांना नटवून-सजवून, वाजत-गाजत यात्रेत घेऊन येत आहेत.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement