Dmart कडून प्रत्येक महिन्याला कमावू शकता लाखो रुपये, काय आणि कसं करायचं? ही संधी सोडू नका
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हे ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना परवडणाऱ्या दरात सामान उपलब्ध करून देतं आणि विक्रेत्यांमध्ये स्पर्धा निर्माण करतं.
डीमार्ट ही एक अशी सुपरमार्केट चेन आहे जी आज जवळपास प्रत्येकाला माहीत आहे. येथे नेहमीच खरेदीदारांची गर्दी असते. यामागचं मुख्य कारण म्हणजे, डीमार्टमध्ये वस्तू किफायतशीर दरात उपलब्ध होतात. यामुळे अनेक लोक येथे खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहतात. इतर सुपरमार्केट्सच्या तुलनेत डीमार्टची वेगळी खासियत आहे. हे ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना परवडणाऱ्या दरात सामान उपलब्ध करून देतं आणि विक्रेत्यांमध्ये स्पर्धा निर्माण करतं.
advertisement
advertisement
डीमार्टकडून पैसे कसे कमवाल?यासाठी तुम्ही डीमार्टसोबत व्यवसाय करु शकता. जर तुमच्याकडे एखादं क्वालिटी प्रॉडक्ट असेल आणि तुम्हाला ते विकायचं असेल, तर तुम्ही ते डीमार्टमार्फत विकू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही उत्तम दर्जाची मिठाई बनवता? तर तुम्ही डीमार्टशी करार करू शकता. कमी नफा असला तरी जास्त प्रमाणात विक्रीमुळे तुम्हाला चांगली कमाई होऊ शकते. हे फक्त मिठाईपुरतं मर्यादित नाही; कोणत्याही उत्पादनासाठी हीच पद्धत लागू होते.
advertisement
advertisement
advertisement
जमीन किंवा दुकान देऊनही कमाई करता येतेडीमार्ट विस्ताराच्या प्रक्रियेत आहे. जर तुमच्याकडे जागा, घर किंवा दुकान असेल आणि तुम्हाला ते विकायचं किंवा भाड्याने द्यायचं असेल, तर डीमार्ट त्यामध्ये रस दाखवू शकतो. 2000 पासून ही कंपनी देशभरात विस्तार करत आहे आणि सध्या 70 पेक्षा जास्त शहरांमध्ये तिचे स्टोअर्स आहेत. यासाठीही तुम्हाला हाच फॉर्म भरावा लागेल: https://www.dmartindia.com/partner-with-us


