राज्यात सोयाबीन खरेदी कधीपासून सुरू होणार? बाजारभाव किती मिळणार? शासनाकडून आली नवीन अपडेट
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soybean Market : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. यंदा राज्यात हमीभावाने सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. यंदा राज्यात हमीभावाने सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदणीला ३० ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या माहितीनुसार, राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये हमीभाव खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे.
कोणत्या पिकांसाठी किती हमीभाव?
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सोयाबीनचा हमीभाव प्रति क्विंटल ५,३२८ रुपये आहे. मुगासाठी ७,७६८ रुपये प्रति क्विंटल तर उडीदासाठी ७,८०० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळवून देण्यासाठी आणि बाजारभावातील अनिश्चिततेपासून संरक्षण देण्यासाठी घेण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांत होईल खरेदी?
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांच्या माध्यमातून खरेदी केली जाणार आहे. त्यामध्ये. अकोला, अमरावती, बीड, बुलडाणा, धाराशिव, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नंदुरबार, परभणी, पुणे, सांगली, सातारा, वर्धा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ, भंडारा आणि गडचिरोली.
advertisement
एनसीसीएफमार्फत खरेदी होणारे जिल्हे: नाशिक, अहमदनगर, सोलापूर, हिंगोली, चंद्रपूर आणि नागपूर.
शेतकऱ्यांनी काय करावे?
हमीभाव योजनेअंतर्गत खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने ‘पॉस मशीन’द्वारे केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतील जसे की, आधारकार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा ७/१२ उतारा, पीकपेरा प्रमाणपत्र नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे संदेश मिळेल. त्या संदेशानुसारच शेतमाल घेऊन खरेदी केंद्रावर यावे.असं सांगण्यात आले आहे.
advertisement
अधिकाऱ्यांचे आवाहन
view commentsमहाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रेय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर बी. डुबे-पाटील आणि संचालक मंडळ यांनी संयुक्त निवेदनात सांगितले की, “शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा योग्य दर मिळवण्यासाठी या हमीभाव योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने राबवली जाणार आहे.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 2:06 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
राज्यात सोयाबीन खरेदी कधीपासून सुरू होणार? बाजारभाव किती मिळणार? शासनाकडून आली नवीन अपडेट


